शिवसेनेने कधी झेंडा बदलला नाही ; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

0
कोल्हापूर : देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही, जणतेनी त्याला नाकारलं. भाजपकडून पंतप्रधानपदासापासून ते सरपंचपदासाठी एकच फोटो वापरला जातोय, त्यामुळे सरपंच कोण आणि पंतप्रधान कोण हेच समजत नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.ते कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ व्हिडिओद्वारे बोलत होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “देशात भाजपने बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, लोकांनी त्याला झिटकारलं. हिंदूहृदयसम्राट म्हटल्यावर लोकांच्या समोर एकच नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हिंदू अडचणीत असताना कोणतीही पर्वा न करता मदतीला जाणारा म्हणजे हिंदूहृदयसम्राट होय. भाजपचा भगवा हा खरा भगवा नाही, नकली भगव्याचा बुरखा हा फाडायला हवा.”कोल्हापूर ही शिवसेनाचा बालेकिल्ला आहे.गत निवडणूकीत भाजपाने कॉग्रेसला छुपी मदत केली होती.

 

 

Rate Card

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगावमधला भगवा यांनी खाली उतरवून नकली भगवा चढवला. खोटं बोलून चार राज्यात तुमचं चाललं असेल…पण इथं नाही चालणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.