सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये दोन आशा स्वयंसेविका यांचे अपघात मुळे गंभीर जखमी झालेल्या होत्या, त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने सांगली जिल्हा परिषद कडे जिल्हा परिषद च्या सेंस फंडातून आशा व गटप्रवर्तकांना हॉस्पिटलचे देय रक्कम देण्यात यावी, यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकांच्या साठी मेडिकल क्लेम ही योजना सेंस फंडातून मंजूर केली आहे.त्यातील पहिली फाईल माळवाडी मधील आशा स्वयंसेविकेची आहे.लवकरच त्या आशा स्वयंसेविका हीच्या बँक खातेवर पैसे जमा होतील.
हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले आहे. त्यामुळे लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी आरोग्य सभापती ,जिल्हा आरोग्य अधिकारी , इतर अधिकारी,व मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.आज जिल्हा परिषद मधील वसंतदादा पाटील सभागृह सकाळी ११ वाजता कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित रहावे,असे आवाहन,कॉ उमेश देशमुख,कॉ मिना कोळी, कॉ हणमंत कोळी,अँड सुधीर गावडे, सुरेखा जाधव, अंजू नदाफ, शबाना आगा,सुवर्णा सणगर, मंजूषा साळुंखे यांनी केले आहे.