शेतकरी बांधवांना बियाणे व खते कमी पडू देणार नाही | रासायनिक खते व बियाणे बाबत गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल ; पालकमंत्री दादाजी भुसे

0

 

पालघर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना आवश्यकतेनुसार खते व बियाणे पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाणार भेसळयुक्त खते, बनावट बियाणे विक्री करून शेतकरी बांधवाची कोण फसवणूक करत असेल अशा गैरप्रकाराबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले

खरीप हंगाम आढावा बैठक व पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती त्या वेळी पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढण, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा राजेश पाटील जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सलीमठ तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व पत्रकार उपस्थित होते

प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जिल्हयातील एकूण 24964 शेतकऱ्यांनी 12655.44 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदविला असून 208 शेतकऱ्यांना 23.91 लाख रुपयांचे विमा अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. • हवामानावर आधारीत फळपिक विमा योजन चिकू, आंबा, काजू व केळी 283 शेतकऱ्यांनी 190.05 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदविला असून 283 शेतकऱ्यांना रक्कम 56.11 लाख रुपयांचे विमा अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले

Rate Card

हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना- आंबा, काजू व केळी योजनेमध्ये जिल्हयातील एकूण 2884 शेतकऱ्यांनी 1507.71 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग नोंदविला आहे.
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-22 मध्ये 34 अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर केले असून 6 प्रस्ताव मंजूर झाले
म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो अंतर्गत फळबाग लागवड सन 2021-22 मध्ये पालघर जिल्हयात 2700 हेक्टरचे उद्दीष्ट देण्यात आले होते. पैकी जिल्हयात 2201.48 हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची लागवड करण्यात आली असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले
महाडीबीटी पोर्टल वर 10780 अर्ज प्राप्त निवड झालेले लाभार्थी 3480 लाभ दिलेले 590 अनुदान वितरण . 339.51 लाख रुपये
आत्मा योजने अंतर्गत कृषि प्रदर्शन, प्रात्यक्षिके, शेतकरी अभ्यासदौरे, शेतकरी प्रशिक्षण, शेतीशाळा, शेतकरी मित्र, शेतकरी किसान गोष्टी इत्यादी घटकांकरीता सन २०२१-२२ मध्ये . ९९.७० लाख रुपये अनुदान खर्च करण्यात आले आहे.

सन २०२२-२३ मध्ये ५०० हेक्टर क्षेत्रावर नाविन्यपुर्ण बाब काळा भात पिक प्रात्यक्षिके आयोजित करणे प्रस्तावित आहे. (सन २०२१-२२ मध्ये २०० हेक्टर वर राबविण्यात आले.)
सन २०२२-२३ मध्ये १००० मत्स्यबीज बोटुकलीचा डब्यांचा पुरवठा करणे प्रस्तावित आहे. (सन २०२१-२२ मध्ये ८९१ शेततळयात मत्स्यबीज बोटुकली पुरवठा.) • पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात काळा भात लागवड, भाजीपाला लागवड, भुईमुग लागवड, नागली लागवड, मोगरा लागवड काळा तीळ, वरई लागवड, मत्स्यशेती संगोपन, मिरची लागवड, हरभरा लागवड, कलिंगड लागवड, भेंडी लागवड याप्रमाणे एकुण ५३ शेतीशाळा राबविण्यात आल्या आहेत. सन २०२२-२३ मध्ये पालघर जिल्ह्यात एकूण ९२ शेतीशाळा राबविणे प्रस्तावित आहे.
सन २०२२-२३ मध्ये पालघर जिल्ह्यात प्रति तालुका १०० शेतक-यांचे कौशल्य
आधारीत शेतमजुर प्रशिक्षण राबविणे प्रस्तावित आहे असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

९ ऑगस्ट २०२१ रोजी व १५ ऑगस्ट, २०२१ रोजी कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड येथे पालघर जिल्ह्यातील रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. • “विकेल ते पिकेल” योजनेंतर्गत संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजार अभियान अंतर्गत शेतकरी
ग्राहक विक्री अंतर्गत २७४ विक्री स्थळे सध्यस्थितीत चालु
आहेत.
कृषि क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढविणेसाठी सन २०२२ हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे करावयाचे आहे.१२. नागली पिकाची उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. त्याचे पोषण मुल्याचा विचार करुन त्याप्रमाणे पदार्थाची निर्मिती करुन शेतक-याचे उत्पन्न वाढविणेसाठी प्रयत्न करावेत. असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले
वसई भागातील फुलशेती प्रमाणे डहाणू, विक्रमगड, वाडा भागात देखील क्षेत्र वाढ करावी. केवळ शेतक-यांचे प्रयत्न उपयोगी नाहीत. विभागाने देखील विशेष प्रयत्न करावेत. मुंबई जवळ असल्याने मोठा वाव आहे. रब्बी हंगामातील पिकाखालील क्षेत्रात वाढ करावी. दुबार पिकांसाठी शेतक-यांना प्रोत्साहीत करावे. भाजीपाला, फुलशेती, सुगंधी वनस्पती यांना वाव आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न जिल्हयात आहे. त्यासाठी शेतक-यांचे प्रबोधन करणे. कंद व मुळवर्गीय पिकांचा प्रयोग जिल्हा कृषी विभागाने करावा अशी सूचना दादाजी भुसे यांनी दिल्या
जिल्हयांत ठिबक व तुषार सिंचनाची प्रगती संथ आहे. त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्फत विहीरीच्या कार्यक्रमांना या उपक्रमासाठी जोड दयावी. जेणेकरुन ओलीताखाली क्षेत्र वाढेल. रब्बी हंगामात शेतक-यांचा पिके घेण्याचा कल वाढेल. जिल्हयातील लिची लागवडीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. कडधान्य उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे. बांधावरील तूर लागवडीस अधिकाधीक प्रोत्साहन देणे. रब्बीमध्ये हरभरा घेण्यासाठी शेतक-यांना प्रवृत्त करावे असे निर्देशही पालक मंत्री दादा भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.