किरनगीतील बाळासाहेब पाटील यांचे निधन

0
Post Views : 36 views
जत,संकेत टाइम्स : किरनगी ता.अथणी (कर्नाटक) येथील बाळासाहेब शंकरराव पाटील वय ६७ यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याचे निधन झाले.
डफळापूर येथील कॉग्रेस नेते स्व.सुनिलबापू चव्हाण यांचे मेव्हणे तर पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सचिव महेश चव्हाण यांचे मामा होत.बाळासाहेब चव्हाण हे मुळ गाव कर्नाटकातील किरणगी येथील रहिवाशी आहेत.
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे विश्वासू कार्यकर्ते होते.सवदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संस्था,बँकेत ते संचालक होते.सध्या ते शेती व्यवसायासाठी भिवर्गी येथे कुंटुबियासह राहत होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,भाऊ,बहिणी,पुतणे असा मोठा नातलग वर्ग आहे.
सगळ्याशी मनमिळावू स्वभाव,राजकारणात,समाजकारणात त्याना मोठा मान असायचा,त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.मंगळवार ता.३ रोजी भिवर्गी येथे सकाळी रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.