जतेत खाजगी सावकाराविरोधात मोठी कारवाई | वीस कोरे स्टॅप, वेगवेगळ्या बँकेचे ७८ धनादेश, पाच खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी व चारचाकी जप्त

0

जत, संकेत टाइम्स : बिळूर (ता. जत) येथील व्यापाऱ्यास दीड लाखाचे कर्ज देऊन अडीच लाखाची वसुली करीत आणखी दोन लाख दहा हजारांची मागणी करणाऱ्या जत येथील खासगी सावकाराविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लखन मारुती पवार, असे खासगी सावकाराचे नाव आहे.

 

यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत वीस कोरे स्टॅप, वेगवेगळ्या बँकेचे ७८ धनादेश, पाच खरेदी दस्त, नोटरी, सात दुचाकी व चारचाकी जप्त करण्यात आली आहे.बिळूर येथील राजू चांदसाहेब व्हनवाड (वय ३९, रा. तलाव फाटा, बिळूर) यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. ते द्राक्षांचा व्यापारही करतात. त्यांनी जत येथील खासगी सावकार लखन मारुती पवार याच्याकडून १६ ऑक्टोबर २१ रोजी एक लाख ५०हजार रुपये घेतले होते. दर आठवड्याला १२ टक्के व्याजदर ‘देण्याचे ठरले होते.

 

ऑक्टोबर २१ पासून जानेवारी २२ पर्यंत आठवड्याला १८ हजार रुपये याप्रमाणे पवार याने राजू यांच्याकडून एक लाख ८० हजार रुपये वसूल केले. त्यानंतर आजवरच्या कालावधीत आणखी ७२ हजार रुपयांचे व्याज वसूल केले. एकूण २ लाख ५२ हजार रुपये पवार याने राजू व्हनवाड यांच्याकडून वसूल केले.एवढी रक्कम घेऊनही तो राजू यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपये मुद्दल आणि ६० हजार रुपये व्याजाची मागणी करीत होता.लखन पवार याने सातत्याने त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता.

Rate Card

 

अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात लखन पवार यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार जत पोलिसांनी पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लखन अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पवार फरार झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.