प्रज्ञा काटे हिला राज्यस्तरीय बालगौरव पुरस्कार जाहीर

0
Post Views : 115 views
 जत, संकेत टाइम्स : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आलेल्या जत येथील प्रज्ञा बाबासाहेब काटे  हिला ग्लोबल फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श बालगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल  राज्यातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जत येथील प्रज्ञा बाबासाहेब काटे हिला राज्यस्तरीय ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन पुरस्कार 2021 साठीचा राज्यस्तरीय
आदर्श बालगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक, शैक्षणिक,औद्योगिक, कला, क्रिडा, वैद्यकिय व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन, नांदेड यांच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रातील
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना ग्लोबल अविष्कार फाऊंडेशनकडून पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सामाजिक कार्यकर्ते व स्टॅम्पव्हेंडर बाबासाहेब काटे यांची प्रज्ञा ही कन्या असून आतापर्यंत प्रज्ञा काटे हिने अनेक सामाजिक व शैक्षणिक विषयावर वक्तृत्व स्पर्धा व कार्यक्रम प्रसंगी सहभाग घेत सामाजिक क्षेत्रात प्रबोधन करण्याचे काम केले आहे.
ती बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून तिला सामाजिक कार्याचीही आवड आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन  नांदेड येथे सत्कार करण्यात आले. या सत्काराच्या निमित्ताने राज्यातून तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.डी.पी.सावंत व प्रमुख उपस्थिती म्हणून तर सौ.जयश्रीताई निलेश पावडे,डॉ. उद्धव व्यं. भोसले, निसार तांबोळी, वर्षा ठाकूर-घुगे,बबन जोगदंड,एकनाथ उर्फ अनिल मोरे डॉ.गोविंद नांदेडे, शिवाजीराव कपाळे,प्रशांत प्रकाश दिग्रसकर,डॉ.सौ. सविता बिरगे,
डॉ.सान्वी जेठवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीसह फाउंडेशनचे प्रलोभ कुलकर्णी, बालाजी तोरणेकर, रुपाली आडगांवकर दयानंद कोजीवाले,सावित्री तोरणेकर, जनक गादगे, प्रमोद फुलारी बाबासाहेब काटे उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.