जत,संकेत टाइम्स : उमदी ता.जत येथील प्रसिद्ध डॉक्टर्स डॉ.रविंद्र हत्तळी यांना बेस्ट मोस्ट डेडीकेटट पँल्टिनम मल्टिपल लॉयन आवार्ड हा पुरस्कार देऊन गौरविण़्यात आले.
औरंगाबाद येथे झालेल्या राज्य स्तरीय दोन दिवसीय बहुप्रांतीय अधिवेशनामध्ये डॉ.हत्तळी यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी अनुक्रमे एमजीएफ लॉ.संजय खेदान(नेपाल),लॉ.डॉ.नवल मालू,लॉ
विवेक अंभ्यकर ,लॉ.नरेंद्र भंडारी, लॉ.प्रेमचंद बाफना,लॉ.द्वारका ज्वालन,पश्चिम महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट गर्व्हरनर लॉ.सुनिल सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुळ जत तालुक्यातील उमदीचे असलेले डॉ.हत्तळी यांनी लायन्स क्लबमध्ये उल्लेखनीय काम केले आहे.त्यांनी आतापर्यत ८ क्लबची स्थापना केली आहे.वैद्यकीय क्षेत्रातील नवीन सुमारे १६२ मेंबर लायनीजममध्ये आणले आहेत. डॉ.हत्तळी यांनी लॉयन्स क्लबमध्ये आपला वैद्यकीय व्यवसाय संभाळत चांगले काम केले आहे. यांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यत आले आहे.याबद्दल डॉ.हत्तळी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जत : डॉ.रविंद्र हत्तळी यांचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याहस्ते बेस्ट मोस्ट डेडीकेटट पँल्टिनम मल्टिपल लॉयन आवार्ड देऊन गौरव करण्यात आला.