संख येथे संत बागडेबाबा यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा,धार्मिक कार्यक्रमास सुरुवात

0
संख,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख ( गोंधळेवाडी) येथे राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्यसंपन्न श्रीसंत सयाजी बागडेबाबा यांच्या मंदिरात श्री संत बागडेबाबा यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात झाली.हा कार्यक्रम १६ मे ते २१ मे अखेर होणार आहे.
     वैराग्यसंपन्न श्रीसंत सयाजी बागडेबाबा आश्रम संख गुड्डापूर रस्त्यावर आहे.श्रीसंत सयाजी बागडेबाबा यांचे  भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.
    भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम बागडेबाबा यांनी केले. बागडेबाबा यांनी  मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी भुयार येथे अनेक वर्षे वास्तव करत भक्तांना अंधश्रद्धेपासून दूर रहा असा संदेश दिला.
    .सकाळी दहा वाजता वीणा पूजनसकाळी दहा वाजता वीणा पूजन व ग्रंथ पूजन तुकारामबाबा महाराज,अमृत पाटील महाराज,वसंत काटे महाराज (जवळा) यांच्या हस्ते झाला.ज्ञानेश्वर पारायण कार्यक्रमाला सुरुवात झाली. ग्रंथ पूजन झाले.ज्ञानेश्वर पारायण कार्यक्रमाला सुरुवात झाली.वीणा उभारण्यात आला.
    यावेळी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वसर्वी ह भ प तुकाराम बाबा महाराज, रखमाजी चाबरे महाराज, अमृत पाटील महाराज,वसंत काटे महाराज जवळा,वीणाधारक विलास कुलकर्णी,सुप्रिया ताई बंडगर महाराज,नवनाथ महाराज आळंदी,गोरख रायते महाराज पंढरपूर ,विश्वजित काटे महाराज, प्रवचनकार सोमनाथ काटे महाराज,राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्यु कॉलेजचे माजी प्राचार्य रामगोंडा फुटाणे,तमाण्णा बागेळी, आमगोंडा हुबनूर,मनोहर पाटील उपस्थित होते.
    रात्री आठ वाजता हभप वसंतराव महाराज काटे, हभप जायाप्पा महाराज, हभप अमृत पाटील महाराज, हभप युवराज शिंदे महाराज, हभप पुंडलिक साठे महाराज, हभप जंगली महाराज यांचे कीर्तन व आसंगी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम झाली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.