जतला मान्सूनपुर्व वळवाचा पाऊस

0
51
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील अनेक भागात गुरूवारी मान्सून पूर्व वळवाचा पाऊस झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर पडला. हा पाऊस ऊस पिकाला पोषक आहे. शिवाय रानभाज्या विशेषत: भाजीपाला आणि वांगी, दोडका, टोमॅटो इत्यादी फळभाज्यांनाही पूरक असा आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिवसा प्रचंड उष्मा आणि रात्रीच्या वेळी ढगाळ वातावरण असे वातावरण होते. यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. दरम्यान, जत तालुक्यातील शहरासह अनेक भाग सायंकाळी पाचच्या सुमारास मोठा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना काही अंशी उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
तब्बल तासभर झालेल्या पावसाने  शहरात भरलेल्या बाजाराची दाणादाण उडाली.जत,डफळापूरचा गुरूवारी बाजार असल्याने बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती.

 

वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सर्व ठिकाणी पाणीचपाणी झाले. तालुक्याच्या पूर्वेकडून आलेला हा पाऊस तालुक्यातील जतसह अनेक गावात कमी-अधिक प्रमाणात झाला.दरम्यान रात्री उशिरापर्यत संततधार सुरू होती.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here