कोरोना पहिल्या लाटेत लढलेला शहिद योध्दा ; नानासाहेब कोरे

0
2

कोरोनाच्या पहिल्या लाटेत‌ जिवाची बाजी लावून सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आपला जीवाची ज्यांनी बाजी लावत अशा डफळापूर येथील कोरोना योध्दा नानासाहेब कोरे यांचा आज (21 मे ) द्वितीय स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्या आठवणींना दिला हा उजाळा..
डफळापूर येथील कोळीवस्ती येथे शिक्षक असणारे नानासाहेब कोरे यांना कोरोनाच्या पहिल्या विक्राळ लाटेत कर्नाटक महाराष्ट्र हद्द‌ असणाऱ्या शिंगणापूर फाटा येथे चेकपोस्टवर पोलीसासोबत मदतनीस म्हणून कर्तव्य बजावत‌ असताना
12 मे 2020 कर्नाटकातून आलेल्या ट्रक तपासणी न करताच भरधाव पळवून नेहल्याने त्यांचा पाठलाग ‌करत‌ असताना डफळापूर स्टँड जवळ भरधाव ट्रक चालकाने अंगावर घातल्याने सदर शिक्षकाचा मृत्यू झाला होता.कोरोनाच्या आक्राळविक्राळ पहिल्या लाटेत देशभक्ती बजावत असलेल्या एका कर्तव्यदक्ष शिक्षकांला जीव गमवावा लागला होता.
शाळेला आपले दैवत्य‌ दिलेल्या जबाबदारीला कर्त्तव्य समजणारे नानासाहेब कोरे कोरोना योध्दे ठरले आहेत.अगदी संकट काळात त्यांनी बजावलेली कर्तव्यदक्षता आजही स्मरणात राहणारी आहे.उच्चशिक्षित पत्नी,एक मुलगा,भाऊ,शेतकरी वडील,पोस्टात नो करी करणारे चुलते असा हसता खेळता परिवार असलेले नानासाहेब यांच्या आकस्मिक जाण्याने कुंटुबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कायम आपली जबाबदारी मनापासून पुर्ण करणे असा पांयडा नानासाहेब कोरे या शिक्षकांचा होता. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सर्वोत्तम शिक्षण घेतला पाहिजे यासाठी त्यांचे कष्ठाक्षणाने लक्ष असायचे,वडिलाच्या इच्छेखातर शिक्षकांची नोकरी पत्करलेल्या महाराष्ट्र, केंद्रीय लोकसेवाचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकांचा दुर्देवाने ओढावलेला मुत्यू कधीही विसरणारा नाही.
देशातील कोरोना योध्दाच्या यादीत कागदी आमरत्व मिळालेल्या नानासाहेब कोरे‌ या शहिद योध्दांचे कुंटुबिय आजही शासकीय मदतीपासून वचिंत‌ आहे.खऱ्या अर्थांने आजच्या स्मृतीदिनी त्यांच्या पश्चात पत्नी,मुलासाठी शासन स्तरावर विचार व्हावा..हिच खरी श्रंध्दाजली ठरेल.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here