शिक्षक बँकेवर शिक्षक संघाचा झेंडा फडकणार ; बसवराज येलगार
जत, संकेत टाइम्स : सलग बारा वर्षे शिक्षक बँकेवर शिक्षक समितीने सत्ता उपभोगली, पण बारा वर्षांपूर्वी सभासदांना दिलेल्या वचनणाम्याची पूर्तता त्यांना करता आली नाही. त्यामुळे बँकेचे सर्व सभासद समितीच्या कारभारवर नाराज आहेत. म्हणून यावेळेस शिक्षक संघांचे धडाडीचे आणि कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक संघाच्या पॅनलचा झेंडा सभासदांच्या आशिर्वादाने बँकेवर फडकणार आहे,असे मत शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष बसवराज येलगार यांनी व्यक्त केले.ते जत तालुका शिक्षक संघाच्या कार्यकारणी बैठकीत बोलत होते.
सत्ताधाऱ्यांना कर्जावर एक अंकी व्याजदर करण्यात अपयश,बँकेत भरमसाठ नोकरभरती, कमी प्रमाणात लाभांश देणे,यामुळे सभासद यावेळेस सत्ताधाऱ्यांना मतदान करणार नाहीत, असे मतही यलगार यांनी यावेळी व्यक्त केले.
बैठकीस पार्लमेन्ट्री बोर्ड नेते फत्तु नदाफ,तालुका अध्यक्ष दिलीप पवार,सरचिटणीस गांधी चौगुले, प्रकाश गुदळे, देवाप्पा करांडे, जकाप्पा कोकरे, सुभाष शिंदे,नितीन वाघमारे, पिराप्पा ऐवळे, सिकंदर शेख,भगवान नाईक, शिवाजी महाजन , यलाप्पा अभंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




