शिरढोण येथे मध्यरात्री महाराष्ट्र बँकेवर दरोडा, फायरिंग करत चोरट्यांनी एटीएम च लांबवले

0

 

कवठेमहांकाळ : तालुक्यातील शिरढोण येथील महाराष्ट्र बँकेवर चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकत, फायरिंग करत बँकेचे एटीएम मशिनच बोलेरो गाडीतून उचलून नेले. भर वस्तीत असणाऱ्या एटीएम वर चोरट्याचा सशस्त्र दरोडा टाकल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली ही घटना शुक्रवारी रात्री बारा नंतर शनिवारी मध्यरात्रीच्या च्या दरम्यान हा दरोडा टाकल्याची माहिती आहे.

या घटनेची घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, शिरढण हे गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर आहे, या गावात असणारी महाराष्ट्र बँकेची इमारत ही भरवस्तीत आहे, मध्यरात्री चोरट्यांनी सदर बँकेवर धाडसी दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी फायरिंग करत एटीएम मशीनच उचलून नेले. दरोडा टाकत असताना दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठलं निकम जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने फायरिंग केले.

घरमालक निकम यांनी भीतीने दार लावून घेतले. ही गोळी दुसऱ्या दिशेने गेल्याने ते बचावले. तेवढ्यात या चोरट्यानी आपले काम फत्ते करत पलायन केले. या मशीन मध्ये पन्नास लाख रुपयांची रोकड असल्याची चर्चा आहे. निकम यांनी या घटनेची माहिती तातडीने कवठेमहांकाळ पोलीस यांना रात्रीच दिली.

Rate Card

चोरट्यांनी दुसरे मशिनही नेण्याचा प्रयत्न असल्याचे घटनास्थळावरुन दिसून आले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षितकुमार गेडाम, जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले ,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबल यांनी सकाळी तातडीने भेट दिली. आणि पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले, परंतु ते थोड्या अंतरावर जाऊन तिथेच घुटमळत होते. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.