वीज पडून पवनचक्कीचे लाखोंचे नुकसान

0
2
वळसंग, संकेत टाइम्स :  गुरुवारी जत तालुक्यात झालेल्या मान्सून पूर्व अवकाळी पावसाने थैमान घातले होते, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असताना कोळगिरी-व्हसपेठ दरम्यान माळरानावर असणाऱ्या न्यू पॉवर कंपनीच्या पवनचक्की नजीक असणाऱ्या डी.पी. यार्ड मध्ये असणाऱ्या ट्रान्सफार्मर वर वीज पडून आग लागली, घटनास्थळी नगरपरिषद जत यांची अग्निशामक पथक येऊन आगीला आटोक्यात आणण्यात आले.

 

वादळी वारे आणि सोबत विजेच्या गडगडाट सह असणाऱ्या पावसात आमच्या कंपनीच्या लोकेशन क्र. व्ही.एच. – २१ या पवनचक्की जवळ असणाऱ्या यार्डमधल्या डी.पी. वर वीज पडून कंपनीचे सुमारे ९० लाखाच्या जवळपास नुकसान झाले आहे. घटनास्थळी उपस्थित राहून अग्निशामक पथकाच्या साहाय्याने आगीला आटोक्यात आणण्यात आले तसेच घटनास्थळी कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here