डफळापूरचे राजेंद्र शिंदे यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सत्कार | अल्पावधित प्रसिध्द झालेले उच्च न्यायालयाचे वकील सचिन हांडे यांचाही गौरव

0
डफळापूरचे न्यायाधीश राजेंद्र शिंदे व अँड.सचिन हांडे यांचा सत्कार
 

डफळापूर : डफळापूर ता.जत येथील राजेंद्र धनाजी शिंदे यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली. त्यांचे मूळ गाव डफळापुर, तालुका जत आहे. त्यांनी सन 2016 मध्ये एलएलबी आणि 2018 मध्ये एलएलएमचे शिक्षण सांगलीतून पूर्ण केले.जत तालुक्यातील डफळापूर सारख्या भागातील ते पहिले न्यायाधीश होत आहेत.ते कृषी विस्तार अधिकारी श्री. धनाजी रामा शिंदे (पंचायत समिती, कवठेमहांकाळ) यांचे चिरंजीव आहेत.ऐतिहासिक डफळापूर नगरीचे न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दरम्यान डोंगरावरील श्री.बुवानंद ऊरूस कमिटीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान मिरवाड ता.जत येथील अल्पावधित प्रसिद्ध झालेले मुंबई उच्च न्यायालयातील वकील अँड.सचिन हांडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
Rate Card
यावेळी एकविरा तरूण मंडळाचे विजय चव्हाण,वसंत चव्हाण, शेख सर,खतीब साहेब,भारत गायकवाड,किशोर पाटील,संगितराव चव्हाण,राजू चव्हाण उपस्थित होते.
डफळापूर येथील न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.