चुरशीच्या लढतीत युवक नेत्यांचे विजय ;  दिग्विजय चव्हाण,अभिजित चव्हाण यांचा तगडा लढा

0
डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथील सर्व सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणक नुकतीच झाली.यात जेष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब यांचे दिग्गज नेत्याबरोबरचे तगडे पँनेल विरोधात पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,बाजार समितीचे संचालक अभिजीत चव्हाण यांच्या पँनेलने तगडा लढा देत सहा जागा जिंकल्या भलेही सत्ता मिळाली नाही मात्र ताकतवान विरोधी पँनेलच्या दिग्गज नेत्यांना जेरीस आणले एवढे मात्र निश्चित. किंबहुना खतीब यांनी ते मान्य करत यापुढे चुका सुधारून येत्या निवडणूका ताकतीने लढू असे जाहिरही केले आहे.

 

डफळापूर तालुक्यातील संस्थानिक गाव येथे होणाऱ्या प्रत्येक निवडणूकीकडे तालुक्यातील नेत्याचे लक्ष असते.काग्रेस नेते सुनिलबापू चव्हाण यांचा मोठा अमल असलेल्या या गावात त्यांच्या आकस्मिक निधनानंतर सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत.त्यांच्या पश्चात बापू गटाची धूरा त्यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण,पुतणे अभिजीत चव्हाण हे पाहत आहेत.सोसायटी निवडणूकीत त्यांना रोकण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न झाला.एकटे पाडण्यात आले. त्यांच्या गटातील काही मोठ्या नेत्यांनी ऐनवेळी विरोधी गटातून निवडणूक लढवली.अगदी पँनेलच होणार नाही,असे प्रांरभीचे वातावरण..मात्र डळमळीत न होता बापूच्या पश्चात होणाऱ्या या निवडणूकीत पँनेलतर लावलेच,त्याशिवाय अनेक दिग्गज नेत्याच्या तगड्या विरोधी पँनेलला जेरीस आणत आपली उपलब्धता सिध्द केली आहे.या निवडणूकीतील निकालानंतर दिग्विजय चव्हाण,अभिजीत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या उमेदवारांना पडलेल्या मताची आकडेवारी विरोधी गटाला विचार करायला लावणारी आहे.

बापू गटातून युवक नेते भारत गायकवाड यांच्या बहिण जयश्री मोहन गायकवाड,उद्योजक बाळासाहेब चव्हाण, दिग्विजय चव्हाण यांचे काका रमेश चव्हाण,ओबिसी गटातून विजय झालेले अमिर नदाफ,अजितराव माने,अनुसुचित जाती गटातून निवडून आलेले सुनिल वाघमारे या अगदी नवख्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. दुसरीकडे मन्सूर खतीब यांच्या नेतृत्वाखालील पँनेला सत्ता मिळाली मात्र त्यांच्या महत्वाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.त्यांच्या गटातून नव्या दमाचे युवक नेते सज्जनराव चव्हाण, परसराम चव्हाण यांनी थेट निवडणूक लढवत विजयी होण्याची किमया साधली आहे.
जयवंत माळी,पोपट पुकळे यांचा विजयही उल्लेखनीय आहे.ऐनवेळी बापू गटातून बाहेर पडत क्रांती गटातून निवडणूक लढविलेले मनोहर भोसले,राजू भोसले यांचाही मोठा विजय झाला.सागर महाजन यांच्या आई सुवर्णा सिद्राम महाजन यांचा विजय झाला आहे.
नैतिक पराभव मान्य ; मन्सूर खतीब
सोसायटी निवडणूकीत आम्ही ताकतीने पँनेल लावले होते.चांगली प्रचार यंत्रणा राबविली होती.आम्हाला १३ /० विजय अपेक्षित होता,मात्र तसे झाले नाही,आमचे महत्वाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.आम्ही त्याची कारणे शोधू, झालेल्या चुका सुधारून पुढे असेच ताकतीने लढू.
– मन्सूर खतीब,जिल्हा बँक संचालक
आमचा विजयचं : दिग्विजय चव्हाण
सोसायटी निवडणूकीत आम्हाला रोकण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले होते.अगदी आमचे पँनेल लागू नये, इथपर्यत तयारी केली होती.मात्र आम्ही पँनेलतर लावलेच त्यापुढे जात ६ जागा जिंकल्या आहेत.आमच्या अन्य उमेदवारांना काही मतांनी पराभव पत्करावा लागला आहे.आमच्या बळावर आम्ही दिग्गज नेत्यांच्या पँनेल विरोधात लढून जिंकलो आहोत.
दिग्विजय चव्हाण,पंचायत समिती सदस्य
अभिजीत चव्हाण, बाजार समिती संचालक
डफळापूर सोसायटी निकाल, उमेदवारांना पडलेली मते
 
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.