जत,संकेत टाइम्स : जालिहाळ बुद्रुक (ता. जत) येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात बेडग्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली.केसराबाई बाळकृष्ण सावंत (वय 43) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.संशयित पती बाळकृष्ण संदीपान सावंत (वय 55 )याला उमदी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची फिर्याद कृष्णा हंबीर पवार (रा.वळसंगी, ता. विजयपूर ) यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट दिली.जालिहाळ बुद्रुक येथे बाळकृष्ण सावंत याचा विवाह पंचवीस वर्षांपूर्वी कर्नाटक येथील वळसंगी (ता. विजयपूर) येथील केसराबाई हिच्याशी झाला होता.
संदिपान व केसराबाई यांना तीन आहेत. दरम्यान गेल्या चार महिन्यापूर्वी केसराबाई पत्नी केसरबाई चारित्र्यावरून संशय घेत होता. या कारणावरून दोघांच्यात सतत खटके उडत होते. याच कारणावरून चार महिन्यापूर्वी केसराबाई माहेरी गेल्या होत्या. एक महिन्यापूर्वी बाळकृष्ण हा सासरवाडी येथे जाऊन समजूत काढून केसराबाई यांना घेऊन आला होता.
अधून मधून त्यांची सतत भांडणे होत होती.याबाबतची कल्पना तिने तिच्या भावाला दिली होती. मंगळवारी सकाळी पतीपत्नीत यांच्यात भांडण झाले. यावेळी बाळकृष्ण याने बेडग्याने केसराबाईच्या डोक्यात वार केला.वार वर्मी बसल्याने केसराबाई यांचा जागीच मृत्यू घटनास्थळी अतिरिक्त (प्रभारी) उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. संशयित बाळकृष्ण याला जालीहाळ बुद्रुक येथून पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.