छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुख्य वास्तूशास्त्र बांधकाम भवन मुंबईचे नाहरकत पत्र मिळाले

0
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुख्य वास्तूशास्त्र बांधकाम भवन मुंबईचे नाहरकत पत्र मिळाले
जत, संकेत टाइम्स : जत येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगीतील मुख्य वास्तूशास्त्र बांधकाम भवन मुंबई या कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती,जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
जमदाडे म्हणाले, जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यांच्या परवानगीची प्रक्रिया जवळपास पुर्ण झाली आहे.मुंबई येथील वास्तूशास्त्र बांधकाम भवन येथील नाहरकत प्रमाणपत्र व संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला असून येत्या 4-5 दिवसात जिल्हाधिकारी सांगली यांची अंतिम परवानगी मिळेल.
त्यानंतर शहरात भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मोठ्या दिमाखाने उभा राहील.
या नाहरकत दाखल्यासाठी मुंबई येथे मी पाचवेळा जाऊन सर्व अडचणी दूर केल्या आहेत.जिथे अडचण येईल तिथे खा.संजयकाका पाटील व माजी आमदार विलासराव जगताप यांचेकडून संबंधिताना फोन करून पाठपुरावा  केल्याने सर्व नाहरकत दाखले मिळाले आहेत,असेही जमदाडे म्हणाले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.