महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडील या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन   

0

सांगली : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित सांगली कार्यालयामार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहेत. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदू खाटीक, वाल्मीकी, मेहतर, बुरूड, मालजंगम, बेडाजंगम या प्रवर्गातील लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

अनुदान  योजनेसाठी  भौतिक उद्दिष्ट 75 असून आर्थिक  7 लाख 50 हजार रूपये आहे. तर बीजभांडवल योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 75 असून आर्थिक अनुदान 7 लाख 50 हजार रूपये व बीजभांडवल 40 लाख रूपये आहे. अनुदान योजना 50 हजार रूपये पर्यंत असून त्यामध्ये 10 हजार रूपये हे अनुदान म्हणून व 40 हजार रूपये पर्यंत बँक कर्ज लाभार्थींना दिले जाते.  बीजभांडवल योजना 50 हजार रूपये ते 5 लाख रूपयांपर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के व अनुदान 10 हजार रूपये दिले जाते.

प्रशिक्षण योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 150 असून आर्थिक 45 लाख रूपये आहे. ही योजना अनुसूचित जातीच्या लाभरधाकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधीत तांत्रिक व्यवसाय सुरु करण्याकरीता विविध व्यवसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत (3 महिने ते  6 महिने पर्यत) मोफत प्रशिक्षण देण्यात येते. उदा. शिवणकला, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीक वायरमन, टर्नर/फिटर, रेफ्रीजरेशन ॲन्ड एअर कंडीशनिंग, मॅकॅनिक, संगणक प्रशिक्षण, मोटर वाईडींग , फेब्रिकेटर/वेल्डींग, ऑटोमोबाईल रिपेरिंग (टु, थ्री, फोर व्हीलर), पेंटींग (ऑटोमोबाईल्स), मशरुम, वाहनचालक चर्मोद्योग, घड्याळ दुरुस्ती, फोटोग्राफी, कंपोझींग, बुक-बायडींग, सुतारकाम, मोबाईल दुरुस्ती इत्यादी.

Rate Card

या योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य असून आधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगांव रोड,संभाजीनगर सांगली, जिल्हा कार्यालय सांगली-416416, फोन नं 0233 – 2325659 या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.