श्रीकांत होवाळे,राकेश कांबळे वचिंत बहुजन आघाडीत

0
जत,संकेत टाइम्स : रिपब्लिकन पक्षाचे राजीनामे देऊन तालुकाध्यक्ष सह अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केेेला आहे.यामध्ये श्रीकांत होवाळे सर, राकेश कांबळे,शब्बीर नदाफ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

 

त्याचे स्वागत तालुकाध्यक्ष अमोल साबळे यांनी केले.वंचित बहुजन आघाडीत येण्यासाठी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते हे इच्छुक आहेत.लवकरचं तेही प्रवेश करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल भैया साबळे यांनी दिली.
पक्षप्रवेश हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष महावीर कांबळे, महासचिव फारुख कमरी,जिल्हा युवक अध्यक्ष राजू मुल्ला यांच्या वतीने घेण्यात आला.
यामुळे जत तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढलेली असून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याचा निर्धार यावेळेस एक मताने घेण्यात आला.तालुक्यातील प्रश्नावर आवाज उठविण्यात येणार असल्याचेही साबळे म्हणाले.
जत : श्रीकांत होवाळे,राकेश कांबळे यान वचिंत बहुजन आघाडीत प्रवेश केल्यानंतर सत्कार करण्यात आला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.