जत शहरासाठी ४ कोटींचा निधी ; आ.विक्रमसिंह सावंत

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील विविध विकासकामांसाठी ४ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती आ.विक्रमसिंह सावंत यांनी जत पत्रकार बैठकीमध्ये दिली.आ.सावंत शहराची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरणासाठी ३० लाखांचा निधी मंजूर केला असून तसेच त्या बरोबर गेल्या अनेक वर्षापासून सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक या रस्त्यावर दुभाजक बसविण्याची मागणी होत होती.
या रस्त्यावर वारंवार अपघात होत होते.हि गरज लक्षात घेऊन दुभाजकासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करून आणला असून त्याचबरोबर १० सामाजिक सभागृह बांधणे कामी १५० लाखांचा निधी मंजूर केला आहे त्याच बरोबर जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज  चौक,यल्लम्मा देवी कमान ,सोलनकर चौक ,बसवेश्वर चौक ,गणपती मंदिर चौक उमराणी रोड व गांधी चौक हे चौक सुशोभीकरण करण्याबरोबर जत शहरातील सोलनकर चौक येथे पोलीस चौकी बांधणे कामी ५७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
जत शहरातील राजाराम नगर चैतन्य कॉलनी ,कोळी घरासमोरील कोळी प्लॉट ,अभिमन्यू मासाळ घराजवळील ओपन स्पेस व केंचराया मंदिराजवळ ओपन विकसित करणे  तसेच जिम व तारेच्या संरक्षण भिंतीसाठी ४८ लाखांचा  निधी मंजूर झाला आहे.दुधाळ वस्ती ते अंबाबाई मंदिर पादुका १५० मी.रस्ताडांबरीकरण करणे व इदगाह मैदान ते नाटेकर घर ते गेस्ट हाउस मागील बाजू इनुस मकानदार घर रस्ता डांबरीकरण करणे या दोन्ही कामासाठी २३ लाखांचा निधी मंजूर केला आहे.फोरेस्ट रोप वाटिका जवळील सार्वजनिक स्वच्छता गृहाकडे जाणारा सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे या कामासाठी १० लाखांचा निधी  तसेच अचकनहळ्ळी रोड ते गावडे वस्ती ते शेगाव रोड कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी १० लाखांचा निधी ,चरकी  घर ते अंगणवाडीपर्यंत ट्रीमिक्स रस्ता व जत शहरातील डोळळी गल्ली अंतर्गत ट्रीमिक्स रस्ता करणेसाठी  एकूण २२ लाखांचा निधी मंजूर झाला असून  जत शहराचा चौफेर विकास करणे हेच उद्दिस्त असून तसेच जत शहराला वरदान ठरणाऱ्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी पाठपुरावा सुरु असून तोही पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे जत शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे असल्याचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.