जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील धावडवाडी येथून वाळेखिंडी येथे घरी निघालेले डॉक्टरांना गुळवंची नजिक अडवून तीन अनओळखी इसमांनी ४२ हजार रूपये लंपास केले होते.यांचा तपास करत जत पोलीसांनी या रोड रॉबरीचा छडा लावला आहे.यात चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. बिरूदेव भोलानाथ लोंखडे (वय २२, रा.लकडेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. तर लखन गायकवाड (रा.सांगली),लघू घागरे (रा.ढालगाव,ता.कवटेमहाकांळ),अक् षय हावळे (रा.यवत,जि.पुणे) हे तिघे फरारी झाले आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अधिक माहिती अशी,धावडवाडी येथे नवजिवन क्लिनिक हा दवाखाना चालविणारे डॉ.सतिश भिमराव शिंदे हे दररोजप्रमाणे वाळेखिंडी या मुळ गावी जात असताना गुळवंची नजिकच्या रेल्वे फाटकाजवळ संशयित तिंघानी त्याची दुचाकी थांबवून त्यांना मारहाण करत हात बांधून खिसा व पाकिटमधिल ४२ हजाराची रोखड पळविली होती.याबाबत गुन्हा दाखल होताच पोलीसांनी गतीने तपास करत २४ तासात एका संशयितांला ताब्यात घेतले आहे.
अन्य तिघे फरारी असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके पाठविण्यात आले आहे. पोलीस निरिक्षक राजेश रामाघरे,पो.उपनिरिक्षक समाधान लवटे,महेश गायकवाड,पो.ह.नामदेव गोडसे,विनोद हसबे,सचिन हक्के,राजेंद्र सांवत,प्रंशात खोत,अभिजित बुधावले,राजेंद्र पवार,महादेव पाटील यांच्या पथकांने हि कारवाई केली आहे.अधिक तपास उपनिरिक्षक समाधान लवटे करत आहेत.