जत,संकेत टाइम्स : जत प्रिमीयर लीग अर्थात जेपीएलचे प्रथम विजेतेपद एनबी अँड एमजे वॉरियर्स संघाने,उपविजेतेपद तम्मण्णा स्पोर्टस्ने पटकाविले.जत काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे यांनी कै. अरुणअण्णा शिंदे स्पोर्टस् क्लबच्यावतीने आयोजन केले होते.
विजेत्या संघास दिल्लीतील भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक चंद्रसेन सावंत यांच्याकडून ३३ हजार ३३३ रुपये, उपविजेते तम्मण्णा स्पोर्टस् संघास जत सोसायटीचे अध्यक्ष मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी यांच्याकडून २२ हजार २२२ रुपये रोख, तिसरे विजेते कोहिनूर टायटन संघास अनिल हेशी यांच्याकडून ११ हजार १११ रूपये,चौथे विजेते न्यू अभिमान संघास सतीश कलाल यांच्याकडून ७ हजार ७७७ रूपये रोख व स्मृतिचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मँन ऑफ द सिरिज दिनेश जाधव,बेस्ट बँट्समन अरमान ऐनापुरे,बेस्ट बॉलर आकाश सगरे,बेस्ट फिल्डर विनायक जाधव,सलग सहा चौकार ठोकणारे नासीर सय्यद यांना रोख पारितोषिक देवून सन्मानित केले.