भोंजलिंग डोंगराच्या पायथ्यावर वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू

0

 

म्हसवड : विरळी तालुका माण येथील संजय शिवाजी गोरड वय ४१ हे मेंढ्या चारण्यासाठी प्रसिद्ध देवस्थान असलेल्या भोंजलिंग डोंगराच्या पायथ्याशी गेलेल आसता सांयकाळी ५च्या दरम्यान विज पडून जागेवरच मयत झाले.

गेले दोन दिवसापासून माण तालुक्यातील काही भागात पाऊस व ढगाचा गड गडाट व विजाचा कड कडाट सुरू आसुन आज गुरुवार दिनांक ९/६/२०२२ रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान ढगाचा गड गडाट सुरु झाला रिम झीम पाऊस सुरु असताना विजाचा कडकडाट सुरु झाला असताना विरळी येथील संजय गोरड हे भोंजलिंग डोंगराच्या पायथ्याशी आपली मेंढरे चारत असताना विज त्यांच्या अंगावर पडून ते जागीच मृत्यू होऊन पडले होते त्याच्या शेजारी तिन मेंढरे हि या विजे मुळे मरण पावली होती भोंजलिंग डोंगरावरुन देव दर्शन करुन खाली उतरत असताना गाडीतील लोकांनी कोण तरी पडले असूून त्यांच्या शेजारी मेंढर हि पडली असल्याने संशय आल्याने ते जवळ जाऊन पाहिले असता विरळाचे दादामहाराज यांचे बंधू असल्याने गाडीतील लोकांनी दादामहाराज यांना फोनवरून हि घटना सांगीतली तातडीने व संजय गोरड यांच्या घरातील मंडळी घटनास्थळी गेले त्यांनी म्हसवड पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती दिल्या नंतर तलाठी अभंग व म्हसवड पोलीस स्टेशन चे पीएसआय भंडारे व पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा करुन प्रेत उत्तरनिय तपासणीसाठी म्हसवड येथे पाठवण्यात आले आसुन आहे.

 

Rate Card

संजय गोरड यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबची आसुन या भागाला पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठी आसुन शेतीला तर पाणीच नाही या अशा परिस्थिती मेढराच्या शिवाय दुसरा उद्योग धंदा नाही त्यांना दोन मुले आसुन एक मुलगा ५ वीला तर दुसरा मुलगा ८ वी मध्ये गेला आहे आई ,वडील, पत्नी, दोन भाऊअसा मोठा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.