जत,संकेत टाइम्स : जत बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करून महाराष्ट्र कामगार सेनेच्या मागणीची पुर्तता केल्याबद्दल जत एसटी आगाराचे प्रमुख
श्री घुगरे यांचे कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी त्यांचे आभार मानले.तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जत एसटी आगार प्रमुखांना भेटून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी केली होती.
याची दखल घेऊन जत पुणे जत, मुंबई जत हिंगोली,जत हैदराबाद, जत धुळे जत, रत्नागिरी जत व आदमापूर या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू केल्या.त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.त्याशिवाय आगाराचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत झाली आहे,असेही यावेळी श्री.पंतगे म्हणाले.
दरम्यान कर्नाटक राज्यातील जत सौंदती, जत बेळगाव, जत जमखंडी, जत बेंगलोर पंढरपूर जत जमखंडी या गाड्याही सुरू कराव्यात अशा मागणीचे यावेळी कामगार सेनेकडून मागणीचे पत्र देण्यात आले.सध्या सर्व शाळा,कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ग्रामीण भागातील सर्व फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी शाखाप्रमुख अब्बास मुजावर यांनी केली.
यावेळी तालुकाप्रमुख सुरेश घोडके,तालुका उपप्रमुख सोमनाथ,शंकर कॉलनी शाखाप्रमुख भिमराव आडसुळे, सामाजिक कार्यकर्ते इब्राहीम नदाफ, राजेंद्र आरळी हे उपस्थित होते.