सांगली जिल्हा बँकेची हि शाखा पिएम किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यात अव्वल

0
3

– गुरूबसवेश्वर सोसायटीला सर्वोत्तपरी सहकार्य करू  ; प्रकाश जमदाडे

जत,संकेत टाइम्स : बिळूर हे सदन व मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतकरी असलेले गाव आहे.येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या द्राक्ष बागामुळे गावाचे नाव सर्वदूर पोहचले आहे.त्यामुळे या शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेली सोसायटीही तितकीच सक्षम असली पाहिजे,सध्या सोसायटीत २८०० सभासद असून जवळपास ३८ कोटी कर्जवाटप करण्यात आले आहे.गेल्या काही वर्षातील अवर्षणामुळे अडचणीतील शेतकऱ्यांनी प्रोत्साहन निधी योजनेचा लाभ घेऊन,कर्जफेड करावी.सोसायटीच्या उन्नतीसाठी सर्व प्रमाणे सहकार्य करू,असे उद्गार जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी काढले.

 

नुकतीच बिळूर येथील श्री. गुरुबसवेश्वर सह.सोसायटीच्या चेअरमनपदी, माजी प. स.सदस्य रामण्णा जिव्वणावर व व्हा. चेअरमनपदी बसगोंडा जबगोंड यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यांचा सत्कार जमदाडे यांच्याहस्ते करण्यात आला.

 

 

दरम्यान प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात जिल्हा बँकेच्या बिळूर शाखेने सर्व २१८ शाखात प्रथम क्रमांक मिळविला आहे.शाखाधिकारी राहुल सावंत व त्यांच्या सर्व स्टाफने मोठे योगदान दिल्याबद्दल त्यांच्याही जमदाडे यांनी सत्कार करत अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा वसुली अधिकारी राजू कोळी,तालुका अधिकारी आर टी कोळी,गुरुबुसू कायपुरे, बी. एस. घेजी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here