वंजारवाडीच्या धाब्यावर वेटरचा गळा चिरून खून | दुसऱ्या वेटरचे कृत्य : किरकोळ वादातून चाकूने गळा चिरला

0
तासगाव : तासगाव – विटा रस्त्यावरील वंजारवाडी हद्दीतील दोस्ती धाब्यावर एका वेटरने दुसऱ्या वेटरचा चाकूने गळा चिरून खून केला. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सुशांत बजरंग जगताप (रा. बस्तवडे, ता. तासगाव) याला अटक करण्यात आली आहे. तर हणमंत श्रीरंग पिसाळ (रा. बावधन, वाई) असे मयताचे नाव आहे.
     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव – विटा रस्त्यावर वंजारवाडी हद्दीत दोस्ती ढाबा आहे. या धाब्यावर जगताप व पिसाळ हे दोघेही वेटर म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यातून जगताप याने पिसाळ याचा ढाब्यातील चाकूने गळा चिरला. या घटनेने खळबळ उडाली.
      गंभीर जखमी अवस्थेत हणमंत पिसाळ याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पिसाळ याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जगताप याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे करीत आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.