म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांची विष प्राशन करुन आत्महत्या

0
सांगली : सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे हा प्रकार घडला आहे. या कुटुंबाने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार आर्थिक कारणांमुळे हे कुटुंब तणावात होते. यामुळे आलेल्या नैराश्यातून कुटुंबातील ९ सदस्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केल्याचे समजते.

 

या घटनेमुळे म्हैसाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातील या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत होते. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची आता पुष्टी होत आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे.तर नेमके या नऊ जणांच्या मृत्यूचे कारण समोर येईल, असे पोलिसांच्याकडून सांगण्यात आले आहे. म्हैसाळ येथील डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या कुटुंबातील आठ ते नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.
नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई,पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा व्हनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक व्हनमोरे, मुलगा आदित्य माणिक व्हनमोरे, पुतण्या शुभम पोपट व्हनमोरे यांनी राजधानी हॉटेल जवळ तर दुसऱ्या घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा व्हनमोरे,संगीत पोपट व्हनमोरे, मुलगी अर्चना पोपट व्हनमोरे याच्या घरात मृतदेह आढळून आले आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी फौजफाटा घेऊन भेट देत पंचनामा केला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.