माडग्याळ, संकेत टाइम्स : जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब,आंबासह अनेक फळ बागाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळला आहे.मात्र अनेक बागाचे अचानक उद्भविलेल्या रोगाने नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने फळबागाच्या रोग मुक्तीसाठी जत तालुक्यात कायमस्वरूपी कृषी संशोधन केंद्र उभारावे,असे आवाहन युवा नेते डॉ.सार्थक हिट्टी यांनी केले.
तालुक्यातील बेळोंडगी येथील शेतकरी परसू कट्टीमनी यांची द्राक्ष बागेचे अज्ञात रोगामुळे नुकसान झाले आहे.त्या बागेची डॉ.हिट्टी यांनी पाहणी केली.शेतकरी कट्टीमणी यांनी अगदी अडचणीतून,दुसऱ्यांच्या शेतात मोलमजूरी करून पैसे जमवून बाग जगविली होती.प्रंसगी टँकरनेही पाणी घातले होते.मात्र अचानक बागेत उद्भविलेल्या रोगामुळे सर्व बागेचे नुकसान झाले आहे.परिणामी शेतकरी परसू कट्टीमनी यांचा उत्पादन न आल्याने कर्जाचा डोंगर वाढला आहे.असेच प्रकार जत तालुक्यातील अनेक बागांबाबत घडला आहे.
तालुक्यात म्हैसाळ योजनेचे पाणी आलेल्याने मोठ्या शेतकरी शेतीकडे वळला आहे.अनेक पिके घेतली जात आहेत.मात्र शेतकऱ्यांना हवामान,मार्गदर्शन, रोगाबाबत औषधांची माहिती मिळत नाही.त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. शेतीला पाणी उपलब्ध होत असतानाच शेती उत्पादन वाढले पाहिजे यासाठी अशा रोगावर तात्काळ निदान करत औषध फवारणी करणे शक्य होणे गरजेचे आहे.
त्यामुळे तालुक्यात रोगमुक्तीसाठी संशोधन केंद्र उभारावे,असेही डॉ.हिट्टी म्हणाले.नेताजी खरात,भानुदास राठोड,राजू माळी,इरांना माळी,प्रमोद बोगार,विजय चौगुले उपस्थित होते.