थकबाकीदार शेतकऱ्यांनी वसुली प्रोत्साहन निधी योजनेचा लाभ घ्यावा : प्रकाश जमदाडे

0
Post Views : 226 views
जत,संकेत टाइम्स : थकबाकी वसुली व कर्ज वाटपाव्या अडचणी संदर्भात जत कार्यालया मध्ये सोसायटी चे चेअरमन / व्हा.चेअरमन व सचिव / फिल्ड ऑफिसर यांचे समवेत आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीत संचालक प्रकाश जमदाडे,मन्सुर खतीब,सरदार पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. वाघ, सरव्यवस्थापक रामदुर्ग साहेब हे उपस्थित होते.

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातुन विकास संस्था मार्फत शेतक-यांना पिक उत्पनासाठी,शेती व शेतीपुरक व्यवसायासाठी अल्प / मध्यम / दिर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा केला जात आहे. विकास संस्थानी दिलेल्या कर्जची परतफेड शेतकऱ्याकडून वसूल करून वेळेत परत फेड करणे अपेक्षित आहे.माञ वांरवार दुष्काळी परिस्थीती, हवामान बदल, वादळ, अवेळी पाऊस, गारपीट व कोरोना यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अपेक्षित उत्पन्न न आलेने वेळेत परतफेड करता आली नाही, परिणामी शेतकऱ्याकडील कर्जाच्या थकबाकीत मोठी वाढ झालेली आहे. दिनांक ३१ मे २०२२ अखेर ८२ विकास संस्थेकडे ९६ कोटी ४१ लाख इतकी थकबाकी आहे.
संचालक प्रकाश जमदाडे यांनी सर्व संस्था चेअरमन / व्हा. चेअरमन व सचिव फिल्ड ऑफिसर यांना वसूली प्रोत्साहन निधी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आवाहन केले.दिनांक-३०जून २०१८ अखेर थकीत असणारा शेतकरी (पीक कर्ज / अल्प मुदत / मध्यम व दिर्घ मुदत कर्ज ) यांचे ६ टक्के प्रमाणे व्याजने आकारणी करून कोणतेही दंड व्याज न घेता भरून घेऊन खाते रेग्युलर करणेचे आहे. तसेच नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व कर्जासाठी व्याजदरामध्ये २ टक्के रिबेट दिला जाणार आहे.जर १०१ प्रकरण झाले असेल तर त्याचा खर्च वसूल करणेचा असून कोणतेही दंडव्याज घेणेचे नाही, सदर योजनेची मुदत दिनांक-३० जून २०२२ अखेर आहे. सदर मुदत संपल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

या येजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आम्ही आवाहन करतो आहोत,बँकेचे धोरण हे शेतकऱ्यांचे हिताचे व उपयोगाचे राबवणेचा प्रयत्न मी व मन्सुर खतीब करीत आहेत. या योजनेचा जे शेतकरी लाभ घेणार नाहीत त्यांचेवरती १०१ ची कार्यवाही करून थकीत कर्जे वसूल केली जातील असेही प्रकाश जमदाडे म्हणाले. सचिव,फिल्ड ऑफिसर, तालुका विकास अधिकारी किंवा आमच्याशी संपर्क करून काही अडचण असलेस माहीती घ्यावी.
वसुली विभाग प्रमुख पी. ए. कोळी, तालुका विकास अधिकारी आर. टी. कोळी, बँकेचे वसली अधिकारी  आर. टी. नाटेकर व बँकेचे सर्व फिल्ड ऑफिसर व सेवा सोसायटीचे सचिव उपस्थित होते स्वागत आर. टी. कोळी यांनी केले तर आभार मन्सूर खतीब यांनी मानले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.