उमदी,जत पोलीसात विविध गावातील चार गुन्हे दाखल

0
मोटेवाडीत बंद घर फोडले,४५ हजाराचा मुद्देमाल लंपास

जत,संकेत टाइम्स : विठ्ठाबाई अशोक मोटे रा.मोटेवाडी यांच्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, मोटेवाडीतील विठ्ठाबाई मोटे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी पञ्याच्या पेटीतील व बँकेतील एक तोळ्याची चैन,एक तोळ्याचे मणी मंगळसुत्र,६०० रूपये रोख असा  ४५,६०० रूपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे.

 

उटगीत एकाची गळपासाने आत्महत्या

उमदी : उटगी (ता.जत) धोंडाप्पा व्हनप्पा कोळी वय ४५ यांनी राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

 

जतमध्ये एक लाखांचे दागिने लंपास

Rate Card

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील मंगळवार पेठेत
बाजार करत करताना एका दाम्पत्याने पर्स मोटारसायकलला अडकली होती. या पर्समधील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. या पर्समध्ये एक लाखांचे सोन्याचे दागिने होते. याबाबतची फिर्याद सुभाष चंद्रकांत माने. (मोरे कॉलनी, जत) यांनी जत पोलिसात दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी,शहरातील सुभाष माने हे त्यांच्या पत्नी शांता
हे दोघे ढालगाव येथे जाणार होते. तत्पूर्वी मंगळवार पेठेत बाजार घेण्यासाठी ते गेले होते. त्यांच्या पत्नी शांता यांनी मोटरसायकलला पर्स अडकवली होती. काही वेळातच ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ गाडीकडे धाव घेतली. परंतु चोरट्यांनी पर्स व त्यामधील एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस,अर्ध्या तोळ्याची अंगठी, कर्णफुले, सोन्याची चेन असे एक लाखांचे दागिने लंपास केले. त्यांनी बाजारपेठेत शोधाशोध केली. परंतु पर्स मिळाली नाही. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.