कामाण्णा बंडगर माडग्याळ जिल्हा परिषदमधून इच्छूक

0
माडग्याळ(रमेश चौगुले) : भाजपाचे युवा नेते कामांना बंडगर हे माडग्याळ जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.नव्याने झालेल्या या गटात बंडगर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
गेल्या दशकाहून जास्त काळ बंडगर हे लोकसेवेचे  वृत्त घेऊन काम करत आहेत.जिपचे माजी सभापती तम्मणगौडा रविपाटील यांचे समर्थक असलेले कामाणा बंडगर हे भाजपाकडून इच्छूक आहेत.

 

धनगर,लिंगायत समाजाचा मोठा प्रभाव असलेल्या या जिल्हा परिषद मतदार संघात बंडगर यांना मोठा पांठिबा मिळत आहे.माडग्याळ परिसरात सामाजिक कामात बंडगर हे कायम अग्रेसर असतात.तरूण व मोठा युवक वर्ग असलेले बंडगर यांना यावेळी संधी द्यावी,अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.