महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणणारे एकनाथ शिंदेकडे नेमके आमदार आहेत किती ?
Post Views : 12 views
मुंबई: शिवसेनेतील आमदारांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केले आहे. शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. काल मंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात सध्या ४७ आमदार गेले असल्याचे बोलले जात आहे. यात शिवसेनेचे ३८ आणि अपक्ष ९ आमदार आहेत. यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांना उपमुख्यमंत्री पदासह अनेक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर आमदार भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहेत
आमदार
एकनाथ शिंदे, अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, सौ. लता सोनावणे, प्रताप सरनाईक, सौ. यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत शिवसेनेच्या एकुण ३८ आमदारांनी बंडखोरी केली आहे.
