करजगी जिल्हा परिषद गटातून लढणार : रघुनाथ उर्फ राजू सबकाळे

0
करजगी(कल्लाण्णा बालगाव): नव्याने झालेल्या करजगी जिल्हा परिषद गटामधून पुर्ण ताकतीने लढणार असल्याचे मत गिरगावचे युवा नेते रघुनाथ सबकाळे व्यक्त केले.गेल्या अनेक वर्षापासून सबकाळे लोकसेवेत कार्यरत आहेत.करजगी मतदार संघातील प्रत्येक गावात ते संपर्कात आहे.

 

त्याशिवाय ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कामात पुढे असतात कुठलेही नागरिकांचे काहीही काम असू दे पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसीलदार ऑफिस, पोलीस ठाणे, जनतेसोबत जाऊन काम करून देणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे.करजगी जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी तरूण,समाजसेवेला वाहून घेतलेल्या नेत्याची गरज आहे.या भागाच्या सर्वांगीण विकास रघूनाथ सबकाळे सारखे तरूण नेतृत्व करू शकते.त्यामुळे त्यांना पांठिबा वाढत आहे.मतदार संघाची रचना होताच त्यांनी सर्व गावात संपर्क वाढविला आहे.
युवकांवर त्यांचा मोठा प्रभाव असल्याने त्यांची दावेदारी निश्चित मानली जात आहे.रघुनाथ उर्फ राजू सबकाळे यांना यावेळी संधी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.