जत,संकेत टाइम्स : करेवाडी(कोत्येवबोबलाद)(ता. जत) येथे तरुणाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (अॅट्रासिटी) तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागेश आबा शेंडगे, पवन सुभाष शेंडगे, तुषार बिळेनसिद्ध शेंडगे (सर्व रा. करेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद अनिल रवि बनसोडे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना
शनिवारी रात्री घडली.याबाबत माहिती अशी की,करेवाडी (कोत्येवबोबलाद)येथील बनसोडे यांना संशयित नागेश, पवन, तुषार या तिघांनी जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच दगडाने मारून जखमी केले आहे.घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.