पिसाळलेल्या कुत्र्याचा पुन्हा नागरिकांना चावा,नगरपंचायतीची बघ्याची भूमिका

0
कवठेमहांकाळ : काही दिवसापूर्वी कवठेमहांकाळ शहरातील युवावाणी चौकात पिसाळलेल्या कुत्र्याने २८ लोकांचा चावा घेतल्याची घटना अजून ताजी असतानाच शहरातील प्रभाग क्रमांक १३ आणि १७ मध्ये सोमवारी ४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने परिसरातील सुमारे पंधरा ते वीस शेळी,म्हैस,गाई यांना जखमी केले आहे यासोबत पिसाळलेल्या कुत्र्यांने सुनीता दीपक जाधव यांच्या डोळ्याजवळ चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत.त्यांना उपचारासाठी मिरज सिव्हीलला हलविण्यात आले आहे.
सध्या ढगाळ आणि थंड वातावरणामुळे डेंग्यू,मलेरिया,ताप या सारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण वाढलेले असताना दिवसा ढवळ्या पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे प्रभाग क्रमांक तेरा आणि सतरा मधील नागरिकात आणि पशूपालकात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कवठेमहांकाळ शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून या भटक्या कुत्र्यांमुळे अपघाताचे प्रमाण देखील शहरात वाढले आहे.या भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कवठे महांकाळ नगर पंचायतीला वारंवार विनंती अर्ज करून देखील कवठे महांकाळ नगर पंचायतीच्या वतीने फक्त बघ्याची भुमिका घेतल्याचे दिसत आहे.जनतेच्या सेवेसाठी निवडून गेलेले नगरसेवक विविध सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त असल्याने नागरिकांच्या समस्या आणि अडचणी समजुन घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी नेते मंडळीकडे सध्या तरी वेळ नसल्याचे दिसत आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता सामान्य नागरिकांना स्वतःची आणि आपल्या जनावरांची त्यांनाच काळजी घ्यावी लागणार आहे की जनतेचे सेवक जागे होणार काय उपाययोजना करणार आहेत असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांतून केला जात आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.