वारकऱ्यांचा अपघात विमा तात्काळ काढावा ; तुकाराम बाबा महाराज | राष्ट्रीय महामार्गावरील एक बाजू वारीसाठी राखीव ठेवा

0
जत, संकेत टाइम्स : पंढरपुरात आषाढी वारीला भक्तांचा महापूर येतो. विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भक्तगण मोठ्या संख्येने पायी दिंडीने येतात.कोरोनाच्या काळात दोन वर्षे भक्त व विठुरायाची भेट झालेली नाही. यंदा दोन वर्षांनी वैष्णवाचा मेळा भरणार आहे. अशा वेळी पायी दिंडीने, वाहनाने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना अपघात होत आहेत. पायी दिंडीत भरघाव वेगाने येणारे वाहन घुसल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तेव्हा राज्य शासनाने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांचा अपघात विमा काढावा तसेच राष्ट्रीय महामार्गावरील एक बाजू वारीसाठी राखीव ठेवावी अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे.
चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी कोल्हापूर- पंढरपूर मार्गे निघालेल्या वारकऱ्यांची भेट घेवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज यांनी नागजजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत वाहन घुसून १७ हुन अधिक वारकरी जखमी  झाले. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत त्यात वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. देवाच्या ओढीने निघालेल्या वारकऱ्यांचा अशा प्रकारे होणारे अपघाती मृत्यू व जखमी होणे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही तेव्हा राज्य शासनाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी अपघाती विमा योजना सुरू करावी.पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरील वाहनाचा वेग हा अधिक असतो किमान ११० ते १५० च्या वेगाने वाहने धावत असतात.

 

वाहनावर नियंत्रण नसल्याने आजपर्यत अपघाताच्या घटना घडल्या आहेत तेव्हा वारी काळात राष्ट्रीय महामार्गाची एक बाजू ही वारकऱ्यांच्या पायी दिंडी व वाहनांसाठी राखीव ठेवावी. हा पर्याय राखल्याने वारीत निघालेल्या वारकाऱ्यावर अपघाताचा प्रसंगच उदभावणार नाही. या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचेही तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.
■ २० दिंडयांना अन्नदान
मागील अनेक वर्षांपासून चिखलगी भुयार मठात पंढरपूरला विठुरायाच्या भेटीला निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली जाते. मागील दोन वर्षे कोरोनामुळे वारकऱ्यांच्या दिंडीला ब्रेक लागला होता. यंदा वारकऱ्यांची वारी सुरू झाली आहे. चिखलगी भुयार मठ येथे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत २० हुन अधिक दिंडीतील हजारो भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. भुयार मठातील या व्यवस्थेमुळे वारकऱ्यांनी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांचे मनापासून आभार मानले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.