वाळवा पंचायत समितीचा सेवानिवृत्त शाखा अभियंता ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

0
48 हजार 500 रुपये घेताना रंगेहाथ पकडले : सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
वाळवा : शासकीय ठेकेदाराने पूर्वी केलेल्या कामाची एम. बी. करून देण्यासाठी 48 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वाळवा पंचायत समितीचा निवृत्त शाखा अभियंता महादेव विष्णू सूर्यवंशी याला रंगेहाथ पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
      याबाबत माहिती अशी, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील ग्रामपंचायतीकडून त्यांना एका कामाचा कार्यरंभ आदेश मिळाला होता. हे काम त्यांनी पूर्णही केले आहे. दरम्यान तक्रारदार यांच्या कामाची निविदा फाईल महादेव सूर्यवंशी यांनी स्वतःकडे ठेवली होती. या कामाचे मोजमाप (एम. बी) करून बिल काढून देण्यासाठी ठेकेदाराकडून सूर्यवंशी यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
Rate Card
      याबाबत सबंधित ठेकेदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने 27 जून, 28 जून, 7 जुलै व आज 8 जुलै रोजी या तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये सूर्यवंशी यांनी बिलाच्या रकमेच्या टक्केवारीप्रमाणे 48 हजार 500 रुपयांची लाच मागितल्याने निष्पन्न झाले.
       दरम्यान, आज सूर्यवंशी यांच्या घराजवळ सापळा रचला असता त्यांनी सबंधित ठेकेदाराला 48 हजार 500 रुपयांची लाच मागितली व ती स्वीकारली. यावेळी सूर्यवंशी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
     ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, राधिका माने, संजय संकपाळ, भास्कर भोरे, सलीम मकानदार यांनी केल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.