पंढरपूर : दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहात टाळ,मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठ्ठलाचे नाव घेत वारी चालत असतात.कोरोना मुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधी नंतर पंढरपूरची वारी यावर्षी पार पडत आहे.या वारीमध्ये भक्तमंडळीची मुसळधार पावसात देखील मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वैष्णवांचा महासागरच जणू जमला आहे.विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांना दोन वर्षांनी विठ्ठलाच्या पायी माथा टेकण्याची संधी मिळत आहे.
नांदेड जिल्ह्यामधील उमरी गावचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मूर्तीला दोन सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता.त्या अनुषंगाने आषाढी एकादशीला हा संकल्प पूर्णत्वास जाणार आहे.एकुण १९६८ ग्राम शुद्ध सोन्यापासून मुकुटांची निर्मिती करण्यात आली आहे.
या मुकुटाची किंमत १ कोटी ३ लाख रुपये इतकी आहे.विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार आणि त्यांच्या कुटुंबीयाकडून हे मुकुट आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रखुमाईला अर्पण करण्यात येणार आहेत.