जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील तिघेजण ओमान देशात समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना रविवारी (दि. १२ जुलै)दुपारी घडली आहे. या दुर्देवी घटनेत जत येथील शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षाची मुलगी श्रुती व सहा वर्षाचा मुलगा श्रेयस हे समुद्राच्या लाटेत वाहून गेले आहेत. अद्याप समुद्रात त्यांचा शोध लागलेला नाही. या घटनेला शशिकांत म्हमाणे यांचे बंधू अॅड. राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.
🔴 حادثة غرق العائلة الاسيوية في المغسيل بفعل قوة الأمواج إثر تخطيهم حاجز الأمان ! pic.twitter.com/rDZAETJuik
— طقس عُمان 🌦 (@WeatherOman) July 11, 2022
याबाबतची अधिक माहिती अशी की, मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे हे मागील अनेक वर्षांपासून दुबई येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही ) यांच्यासह दुबई येथे यांच्यास राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने शशिकांत, पत्नी, मुले व मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते.
ओमान येथील सलाला समुद्र किनारी ही घटना घडली.घटनेची माहिती मिळताच शशिंकात यांचे बंन्धू दुबई येथे गेले आहेत.मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.