सर्जा राजाचा बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा

0

कवठेमहांकाळ : शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलाप्रती आदरभाव,प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर हा सण मंगळवारी महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला.

शेतकऱ्यांनी सकाळी आपल्या सख्याची खांदेमळणी केली.संपूर्ण मानव जातीला पोसण्याचा भार ज्या खांद्यावर आहे त्या खांद्याला गरम पाण्याने धुण्यात आले.त्यानंतर बैलाच्या खांद्याला हळद लावण्यात आली.त्यानंतर सर्जा राजाला अंघोळ घालून चांगलेच सजवण्यात आले.बैलाच्या अंगावर तसेच शिंगावर विविध रंगांनी रंगरंगोटी केली होती.गळ्यात घुंगरमाळा घातल्या होत्या.याशिवाय नवीन म्होरकी,वेसण,कासरे,कंडे यामुळे सर्जा राजाचे रुप उठून दिसत होते.त्यानंतर त्यांची मनोभावे पूजा करण्यात आली आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

 

Rate Card

गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्व सण-उत्सवांवर गदा आली होती.मर्यादेत राहून व सर्व दक्षता घेऊन नागरिकांना सण साजरे करावे लागत होते परंतु यावेळी कोणतेही नियम आणि अटी नसल्याने बळीराजाने आपल्या सख्याचा सण मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला.सजवलेल्या सर्जा राजाची सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.ढोल-ताशा आणि फटाक्याच्या आतषबाजीमध्ये ही मिरवणूक लक्षवेधी ठरली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.