जत तालुक्यातील अपघाताची वाढती संख्या चिंताजनक ★ बागडेबाबा मानव मित्र संघटना जनजागृती करणार

0

 

 

जत, संकेत टाइम्स : मागील सहा महिन्यात जत पोलीस ठाणे अंर्तगत २७ अपघात झाले त्यात १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर उमदी पोलीस ठाण्यातर्गत आठ अपघात झाले असून त्यात सात जणांना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे. सहा महिन्यातील अपघातातील मयत व जखमी यांची संख्या चिंताजनक आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीला श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना सदैव सज्ज असते. येणाऱ्या काळात श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना वाढते अपघात रोखण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेणार असल्याचे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

 

तालुक्यातील कोसारी मोहित शिवाजी तोरवे, अजित नेताजी भोसले, राजेंद्र संजय भाले या तिघा तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या समरणार्थ कोसारी ग्रामपंचायत व ग्रामीण विकास संस्था कोसारी यांच्या संयुक्त संकल्पनेतून कोसारीत महाआरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून तुकाराम बाबा महाराज बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, डॉ. शिवाजी खिलारे, माजी पंचायत समिती सदस्य श्रीनिवास भोसले, युवा नेते नाथा पाटील, सरपंच तानाजी बिसले, उपसरपंच बाळासाहेब पवार, चेअरमन किसन टेंगले, दादा यमगर, तानाजी चव्हाण, मुख्याध्यापक सावंत , ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक टेंगले, ग्रामसेवक प्रसान कुंभार, लतीफ मणेर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात मोफत औषध उपचार करण्यात आले तसेच अपंग व्यक्तींना सायकलीचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरात ७८ हुन अधिक तरुणांनी रक्तदान केले. कै. मोहित शिवाजी तोरवे यांच्या कुटुंबियाकडून शालेय विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.दिव्यांगांना सायकल व अन्य साहित्य वाटप करण्यात आले.

 

 

कोरोना काळात हजारो कुटूंबियांना मदत केली. तालुक्यात अपघात झाला की तात्काळ मानव मित्र संघटना मदतीसाठी पोहचते. एखाद्याचे घर जळाले तर तात्काळ त्याला संसारपयोगी साहित्य व रोख रक्कम देवून आधार दिला जातो. तालुक्यात दुष्काळ पडला तेव्हा राज्यातील पहिली खाजगी चारा छावणी सुरू केली, पाण्याच्या टाक्याचे वाटप केले हे सर्व मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून केल्याचे सांगून तुकाराम बाबा म्हणाले, आज रस्ते टकाटक झाले, वाहनांचा वेग वाढला. आज हा वेगच जीव घेत आहे तेव्हा पालकांनी, मुलांनी तारतम्य व शासकीय नियमांचे पालन करून अपघात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अपघातात नाहक जीव जातो हे लक्षात ठेवावे.यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी वाहन चालविताना घ्यायव्याची काळजी यावर मार्गदर्शन केले.

Rate Card

 

 

■ कोसारीकरांची अनोखी श्रद्धांजली
कोसारी येथील तिघा तरुणाचा अपघात मृत्यू झाला होता. त्यांच्या समरणार्थ महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दिव्यांगांना सायकल व अन्य साहित्य वाटप, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य वाटप आयोजित करून त्या तिन्ही तरुणांना कोसारीकरांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली.

 

 

■ पाण्यासाठीच्या लढ्यात जतकरांचा सहभाग महत्वाचा
जत पश्चिम भागात म्हैसाळचे पाणी दाखल झाले असले तरी आजही जत पूर्व भागात पाणी पोहचलेले नाही. म्हैसाळच्या पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली. ५०० किलोमीटर चालत मुंबईला गेलो. दुर्देवाने आजही पाणी मिळालेली नाही. जत तालुक्यातील उर्वरित भागात म्हैसाळचे पाणी मिळावे यासाठी जलचळवळ उभा राहणे गरजेचे आहे. पाण्यासाठीच्या लढ्यात जतकरांचा सहभाग महत्वाचा असून या लढ्यात जतकरांनी एकसंघ होवून लढा उभारावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.