तासगावमधून एका दिवसाच्या बालकाचे अपहरण

0

 

तासगाव, संकेत टाइम्स : तासगाव येथील डॉ.अंजली पाटील यांच्या दवाखान्यातून एका दिवसाच्या बालकाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.रविवारी सकाळी हा प्रकार घडला आहे.ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

 

 

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी,तासगाव येथील सिद्धेश्वर चौकात डॉ.अंजली पाटील यांचे प्रसूतीचे खाजगी रुग्णालय आहे.या रुग्णालयात चिंचणी येथील हर्षदा शरद भोसले ही प्रसूतीसाठी शुक्रवारी दाखल झाली होती.शनिवारी भोसले यांचे सिझर होऊन त्यांना मुलगा झाला होता.बाळ आणि बाळंतीण यांची प्रकृती उत्तम होती.
रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लाल साडी परिधान केलेल्या एका स्त्रीने घाई गडबडीत दवाखान्यात प्रवेश केला.त्यानंतर तिने नर्सचा गणवेश परिधान केला.

 

 

Rate Card

नर्स असल्याचं भासवत ती स्त्री बाळ बाळंतीण असणाऱ्या वार्ड मध्ये गेली.तिने कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून त्या एक दिवसाच्या मुलाला काखेत असलेल्या पिशवीत घातले व त्या ठिकाणाहून पोबारा केला.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली असून पोलीस संबंधित महिलेचा शोध घेत आहेत.दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.