जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक | उमेदवारीसाठी युवकांना संधी | या नेत्यांने केली घोषणा

0
जत, संकेत टाइम्स : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांसह भाजप नेते, कार्यकर्ते यांनी सज्ज रहावे. या निवडणुकीत भाजपचा झेंडा पुन्हा तालुक्यात फडकावयाचा आहे. तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज रहावे, असे आवाहन करत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासराव जगताप यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची बैठक पार पडली. बैठकीस भाजपचे नेते मिलिंद कोरे, डॉ. रवींद्र आरळी, आर. के. पाटील, माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील, आकाराम मासाळ, भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव, मनोज जगताप, उपसभापती विष्णू चव्हाण, उमेशसावंत, भाजपचे शहराध्यक्ष आण्णा भिसे, सद्दाम अत्तार, कुंडलिक दुधाळ, लक्ष्मण बोराडे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष संग्रामसिंह जगताप उपस्थित होते.

 

प्रमोद सावंतकडे जत तालुका भाजपची सुत्रे

 

बैठकीच्या प्रारंभी माजी आमदार विलासराव जगताप यांनी मुंबई येथे विलासराव जगतापांनी भाजपची राज्यस्तरीय बैठकीत पक्ष नेतृत्वाने दिलेल्या सूचना व बैठकीची माहिती दिली. सुनील पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जत भाजप तालुकाध्यक्षपदी प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र प्रमोद सावंत यांना देण्यात आले. आगामी जि. प., पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात भाजप कार्यकर्त्याची मते विलासराव जगताप यांनी जाणून घेतली. यावेळी बोलताना भाजप नेते व कार्यकर्त्यानी आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Rate Card
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विलासराव जगताप म्हणाले की,आगामी जि. प., पंचायत समिती निवडणुकीकरता भाजप कार्यकर्त्यानी सज्ज रहावे. निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच आपण स्वतः १० जि. प. गट, २० पंचायत समिती गणाचा दौरा करणार आहोत. या दौऱ्यात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची मुलाखत व माहिती घेण्यात येणार आहे. ती माहिती जिल्हा नेत्याकडे पाठवण्यात येईल व त्यानंतर उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
प्रमोद सावंतकडे भाजपची सुत्रे
भाजप तालुकाध्यक्षपदाचा सुनील पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर नूतन भाजप तालुकाध्यक्षपदी अचकनहळ्ळी येथील प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली. प्रमोद सावंत यांना तालुकाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र बैठकीत देण्यात आले. तालुक्यात भाजप भक्कम करण्याबरोबरच आगामी जि. प., पंचायत समिती निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपणास विजयश्री खेचून आणायची आहे, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे, असे आवाहन केले.
आरक्षण सोडतीनंतर दौरा
जत तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येक उमेदवार विजयी व्हावा यासाठी जोरदार तयारी करत आहोत.आरक्षण सोडतीनंतर गटनिहाय दौरा करणार असल्याचे यावेळी जगताप यांनी जाहीर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.