आंवढी, संकेत टाइम्स : आंवढी ता जत चे लोकनियुक्त सरपंच अण्णासाहेब कोडग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसा निमित्त ग्रामपंचायत येथे केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व वाढदिवस निमित्त गावातील १८ ते ७० वयोगटातील सर्व नागरिकांचा दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला.संरपच अण्णासाहेब कोडग यांनी या पाँलीसीचा प्रिमियम भरला आहे.श्री हनुमान विद्यालय व जिल्हा परिषदेचे सर्व वाडी वस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे, सुरेश शिंदे, उत्तम चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष डॉ.गिता कोडग, अमोल डफळे, उद्योगपती आनंदराव भोसले, लयभारी उद्योग समूहाचे मालक प्रताप सांळूखे, श्रीराम ज्वेलर्सचे मालक दुर्योधन कोडग, सोसायटी चेअरमन लक्ष्मण कोडग,शेगाव सोसायटीचे चेअरमन हरिश्चंद्र शिंदे, साहेबराव शिंदे,सिध्दू माने गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच शेगाव, बागलवाडी, जत या ठिकाणी विविध मान्यवाराकडून कोडग यांना बोलवून केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान नागरिकांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कागदपत्रे १५ आँगष्ट पर्यंत द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कडून शुभेच्छा
जत तालुक्यातील तरूण नेतृत्व असलेले अण्णासाहेब कोडग यांना वाढदिवसाच्या खासकरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी फोनवरून शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.