Sangli | कौतुकास्पद ! शाळेच्या विद्यार्थींनीच्या हस्ते नव्या वर्ग खोल्याचे भूमिपुजन | तम्मणगौंडा रवी पाटील यांचा पुढाकार

0
8
माडग्याळ,संकेत टाइम्स : जाडरबोबलाद ता.जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड व मराठी या दोन्ही शाळांसाठी जिल्हा परिषद सदस्य तम्मणगौंडा रवी पाटील यांनी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी आठ लाख रुपये खर्चून कन्नड प्राथमिक शाळेसाठी नवीन वर्गखोली बांधण्यात आली आहे.

 

 

तर मराठी शाळेसाठी सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून शाळा खोल्या बांधण्यात येणार आहेत. सदर शाळा खोल्यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. माजी सभापती रवी पाटील यांनी हा कार्यक्रम अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला. शाळा खोलीचे भूमिपूजन चक्क एका शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
नारीशक्ती हीच देशाची खरी शक्ती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सक्षम झाल्या पाहिजेत‌ शिकल्या पाहिजेत या उदात्त हेतूने शिक्षणाची गंगोत्री खेडेपाडी पोचवली आहे. एका विद्यार्थिनींच्या हस्ते भूमिपूजन करताना आपणास सार्थ अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया तम्मनगौडा रवी पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कन्नड प्राथमिक शाळेच्या खोलीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
माजी सभापती रवी पाटील यांच्याहस्ते शाळा खोलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, रामनिंग निवर्गी,सुभाष हतळ्ळी, ईश्र्वराप्पा चनगोंड,  सोन्याळ ग्रामपंचायत सदस्य विजय कुमार बगली, सोन्याळ हायस्कूलचे चेअरमन मुचंडी, कुणीकोनुरचे संजय कांबळे आधी मान्यवर उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here