सुरेखा तोड़कर यांना डफळापूर पं.स.गणातून उमेदवारी द्यावी ; मिरवाड ग्रामस्थाची मागणी

0
डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर पंचायत समिती गणातून यावेळी मिरवाड गावच्या कर्तबगार महिला असणार्या सुरेखा यल्लाप्पा तोडकर यांना कॉग्रेसने उमेदवारी देऊन संधी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आली आहे.
मिरवाड मधील पदाधिकारी, जेष्ठ नागरिक व प्रमुख युवक नेत्याची नुकतीच बैठक झाली, त्यात सर्वानुमते सुरेखा तोडकर यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी करण्याचे ठरविण्यात आले.सुरेखा तोड़कर या माजी सांगली बाजार समिती संचालक जे के माळी यांच्या कन्या तर गेल्या पंधरा वर्षापासून मिरवाड येथे सामाजिक काम करत असलेले,सोसासटीचे चेअरमन यल्लप्पा तोड़कर यांच्या पत्नी आहेत.सुरेखा तोड़कर यांनी ग्रामपंचायत सदस्य,उपसंरपच, सोसायटी संचालक म्हणून काम पाहिले आहे.उच्चशिक्षित,संघटन कौशल्य, सामाजिक बांधिलकी जपणारे तोड़कर यांच्या कुंटुबातील महिला प्रथमच पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

 

डफळापूर, मिरवाड,जिरग्याळ,शेळकेवाडी येथे तोडकर यांचा मोठा जनसंपर्क आहे.कुडणूर,शिंगणापूर येथेही त्यांना माननारा वर्ग आहे.
Rate Card
सुरेखा तोड़कर यांना कॉग्रेसने उमेदवारी द्यावी, अशी मागणी मिरवाड ग्रामस्थांनी केली आहे.गेल्या तीन तपाहून जास्त काळ आम्ही कॉग्रेसच्या उमेदवारांना चांगले मताधिक्य देत विजयी केले आहे. यावेळी आमच्या गावातील उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.यावेळी माजी संरपच आण्णाप्पा चव्हाण,धोंडीबा सवदे,गणपती हांडे,कलावती कांबळे,माजी चेअरमन शहाजी हांडे,विद्यमान संरपच संभाजी सवदे, सोसायटी चेअरमन यल्लाप्पा तोडकर,व्हा.चेअरमन बापू हांडे,सिताराम कांबळे,राजू पाटील,बाळासाहेब लवटे,धडाप्पा लवटे,डॉ.बाळासो सुंबळे,सचिन लवटे,विलास‌ सवदे,जयश्री चव्हाण,सुमन हांडे,आंनदा लवटे,अक्षय कांबळे,सागर सवदे,विठोबा तोड़कर,सिध्दू गावडे,पोपट सवदे सर,शिवाजी लवटे,वसंत माळी,शामराव सुबळे,सुनिल कोरे,दिलीप लवटे,काकासो कांबळे,गंगाराम हांडे,त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी नाईक,पंडित सवदे,बंजरग पाटील,संजय सवदे,संदीप कुलकर्णी, सतिश भोसले,रावसो सवदे,सचिन लवटे,सतिश कित्तुरे,सुनिल कांबळे आदी उपस्थित होते.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.