खासदार संजय राऊतांना दिलासा नाहीच,ED कोठडीत वाढ

0
6

 

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडी कोठडीत आहेत. याच प्रकरणी राऊत यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आजही राऊतांना दिलासा मिळाला नसून आता त्यांना आणखी १४ दिवस कोठडीत राहावे लागणार आहे.

 

राऊत सध्या पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कोठडीत असून त्यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र, न्यायालयाकडून राऊतांना दिलासा मिळालेला नाही. कारण त्यांची कोठडी २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.रिपोर्टनुसार पत्राचाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे.

 

चाळीत राहणाऱ्या ६७२ भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने HDIL च्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना ६७२ सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here