वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व राज्यातील सर्वात ऊंच असा कोल्हापूर, पोलीस उद्यान येथील 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. याप्रसंगी सलामी सोहळ्यास उपस्थित राहून ध्वजाला मानवंदना दिली.
याप्रसंगी माझ्या समवेत खासदार धनंजय महाडिक, आमदार पी.एन. पाटील, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, निरीक्षक तानाजी सावंत, इचल. अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, सत्यजित कदम,
जिल्हा परिषद विशेष कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, स्वातंत्र्यलढ्यातील ज्येष्ठ विद्याताई गुरव, अंजलीताई पाटील, भाजप शहर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या उपस्थितीत कोल्हापूरची ओळख असलेल्या या 303 फुट राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.
यावेळी विविध शाळा-विद्यालयातील विद्यार्थी, ncc छात्र, जिल्हा प्रशासन, पोलीस दल मोठ्या संख्येने उपस्थित होते.