– संख(रियाज जमादार) जालिहाळ बुद्रुक येथे स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव” निमित्त दि. १५ ऑगस्ट रोजी न्यू इंग्लिश स्कूल जालिहाळ बुद्रुक या शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन श्री.प.पू. अमृतानंद स्वामीजी (बालगाव आश्रम),व श्री महेश देवरू (श्री गुरुवराव विरक्त मठ,संख) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्वातंत्र्याचा “75व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव” निमित्त दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी श्री निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था, संख. संचलित,न्यू इंग्लिश स्कूल जालिहाळ बुद्रुक (ता.जत) या शाळेत नूतन इमारतीच्या उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी बसवराज पाटील (माजी जि.प.सांगली उपाध्यक्ष तथा संस्थापक),प्रकाश जमदाडे(जिल्हा बँक,संचालक),अँड. चन्नाप्पा होर्तीकर (जि.प.चे माजी सदस्य)नारायण व. देशपांडे (सचिव येरळा प्रो.सोसा.सांगली),श्री निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन सुभाष पाटील,शालाबाई वाघमारे (सरपंच), गणपती जाधव(उपसरपंच),संस्थेचे सर्व संचालक,हितचिंतक, सर्व शाखाप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक वर्ग उपस्थित होते. मुख्याध्यापक आर.एस.तेली यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.