रोडरोमिओ विरोधात कारवाईची मागणी

0

वठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक ठिंगणे यांना भुरट्या चोराचा व रोड रोमिओचा बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Rate Card
या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की,शहरात विद्यानगर येथे दिवसा ढवळ्या वयोवृद्ध व्यक्तींना पोलिस असल्याचे भासवून लुटणारी टोळी फिरत आहे त्यांचा बंदोबस्त करावा व सध्या शाळा,महाविद्यालये बाहेर मुलींच्या छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओमुळे पालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,तरी सकाळी व सायंकाळी शाळा आणि कॉलेज भरण्याचे आणि सुटण्याचे वेळेत विद्यानगर परिसरात पोलीस बंदोबस्त देण्यात यावा,सर्व रोड रोमिओ हे अल्पवयीन आहेत व ते मोटारसायकल भरधाव वेगाने चालवत मुलींची छेड काढत असतात.

 

                या वेळी शहर अध्यक्ष महेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष संजय कोळी,शहर कोषाध्यक्ष रवींद्र माने,नगरसेवक राहुल जगताप,प्रशांत खाडे,विक्रम पाटील,तौफिक सावनुरकर, विश्वजित भोसले,शितल कुंभार,सरफराज सावनुरकर,शुभम जाधव,युवती तालुका अध्यक्ष साईश्वरी जाधव,शहर संघटक सुवर्णा कवठेकर,शहर कार्याध्यक्ष प्राजक्ता बोगार,जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपा जाधव,आकांक्षा कुलकर्णी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.